पुण्याच्या माजी उपसरपंचाचा ‘ असा ‘ मास्टरप्लॅन की भलेभले भुलले अन

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. पुणे इथे असलेल्या विविध कंपन्यांमध्ये ‘ मी तुमच्या गाड्या भाड्याने लावतो ‘ असे सांगत या भामट्याने चक्क २५० गाड्या आपल्याकडे भाड्याने घेतल्या आणि त्या परस्पर गहाण देखील ठेवल्या .पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड इथे ही घटना उघडकीस आली असून आरोपी हा चक्क माजी उपसरपंच असल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार , पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील साबळेवाडी येथील ही घटना आहे . ‘ माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, ‘ असे सांगून या महाभागाने नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. आपल्याला काही काम करायचे नाही फक्त गाडी घेऊन दिली की दर महिन्याला पेमेंट सुरु , या आशेने अनेक नागरिक या भुलथापाला बळी पडले अन अशा रीतीने या ठगाकडे तब्बल २५० गाड्या जमा झाल्या त्यानंतर त्याने त्या तारण परस्पर ठेवल्याचे समोर आल्याने प्रकरण उघडकीस आले.

भोसरी पोलिसांनी या माजी उपसरपंचाला अटक केली असून त्याच्याकडून एक कोटी 96 लाख रुपये किंमतीच्या 20 महागड्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सागर मोहन साबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो साबळेवाडी गावात 2014 मध्ये उपसरपंच होता.


Spread the love