महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक काहीशी वेगळी घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे समोर आलेली आहे. ऑनलाइन मैत्री झाल्यानंतर दोन वेळा खोटे लग्न करून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केला. सदर प्रकार हा ऑगस्ट 2021 पासून तर मार्च २०२२ या कालावधीत आळंदी कात्रज, स्वारगेट शिरवळ या ठिकाणी घडला असल्याचे फिर्यादी तरुणीचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणीने आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिलेली असून गौरव प्रवीण चव्हाण ( वय 25 जिल्हा सातारा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीने फिर्यादीसोबत संगम डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाइटवरून मैत्री केली होती त्यावेळी त्याने फिर्यादीला खोटे लग्नाचे आमिष दाखवत ‘ तूच मला आवडली आहेस. मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन. माझी तुला सांभाळण्याची पूर्ण तयारी आहे ‘ असे म्हणत तरुणीला फक्त खोट एक मंगळसूत्र देऊन तिच्यासोबत दोन वेळा खोटे लग्न केले अन अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले असे फिर्यादीचे म्हणणे आहे. आळंदी पोलिसांनी या प्रकाराची तक्रार दाखल करून घेतली असून तपास सुरू आहे