देशभरात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत त्यामुळे नागरिकांचे जीणे आधीच असह्य झालेले असून त्यात वाहतूक पोलीस किरकोळ कारणावरून नागरिकांची अडवणूक करतात आणि केंद्राने आणलेल्या नवीन नियमावलीनुसार दंड आकारणी करतात. नितीन गडकरी यांच्या ताब्यात असलेल्या वाहतूक मंत्रालयाकडून ह्या नवीन दंडाची आकारणी सुरू झालेले असून नागरिकांना अक्षरश: नागवून दंड भरण्याची मागणी करण्यात येते मात्र कायदाच इतका जाचक आहे तर आम्ही तरी काय करणार असे वाहतूक पोलीस सांगतात. अशातच सातारा येथे एका वाहतूक पोलिसाने ट्रिपल सीट अडविल्यानंतर दंडाची रक्कम सांगितल्यावर संबंधित चालकाने चक्क डिझेल आणून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सातारा येथील वाहतूक पोलिस सोमनाथ शिंदे बसस्थानकाशेजारी वाहनांची तपासणी करत असताना एक जण ट्रिपल सीट चाललेला होता. त्याला ड्रायव्हिंग लायसन मागितले असता ते त्याच्याकडे आढळून आले नाही म्हणून शिंदे यांनी त्याला पाच हजार रुपये तर ट्रिपल सीट होता म्हणून एक हजार आणि गाडीला नंबर प्लेट नाही म्हणून पाचशे तसेच भोंगा लावला म्हणून शंभर असा एकूण साडेसात हजार रुपये दंड जवळपास भरावा लागेल असे सांगितले.
संबंधित दुचाकीस्वाराने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हवालदार शिंदे यांनी कमीत कमी ट्रिपल सीट असल्यामुळे हजार रुपये तरी दंड भरावा लागेल असे सांगितले त्यानंतर तो तरुण तिथून पळत गेला आणि एका पेट्रोल पंपावर जाऊन कॅनमधून डिझेल घेऊन शिंदे यांच्या समोर आला. सोमनाथ शिंदे यांच्या समोर आल्यावर त्याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले आणि काडी पेटवून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
युवराज लोखंडे असे या तरुणाचे नाव असून साडेसात हजारांचा दंड कोण भरणार ? महागाई इतकी वाढली आहे ही परिस्थिती बघायला एवढ्या महागाईत आम्ही जगून तरी काय करायचं असा प्रश्न विचारत लोखंडे यांनी स्वतःच्या परिस्थितीला देखील दोष देत नऊ हजार रुपयांचा माझा पगार आहे आणि साडेसात हजार रुपयांचा दंड मी कुठून भरणार ? असा संतप्त सवाल त्याने विचारला.
देशातील सध्याची वाढलेली बेरोजगारी पाहता आणि नागरिकांचे असलेली आर्थिक अडचण विचारात घेता वाहतूक मंत्रालयाकडून चाललेली ही तुघलकी वसुली जाचकच आहे त्यामुळे उपस्थित असलेल्या नागरिकांना देखील युवराज लोखंडे याचे म्हणणे पटत असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी देखील आपले कर्तव्य म्हणून हे काम केले. इतक्या भीषण परिस्थितीत इतका मोठा दंड भरणे कुणालाच शक्य नाही. सेकंड हँड गाड्यांच्या किमती पेक्षा दंडाच्या किमती जास्त आहेत ही एक प्रकारे अशी एक प्रकारे नागरिकांची चेष्टाच सुरू आहे असे देखील नागरिक यावेळी मिळत होते तर नितीन गडकरी यांच्या रोजच्या गोलगप्पा देखील संतापात अधिक भर टाकत आहेत .