पुण्यात खळबळ..आपल्या दोघांचे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवतो म्हणत..

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढत असून अशीच एक घटना पिंपरी इथे समोर आलेली आहे. ‘ माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी तुला सोडणार नाही ‘ असे म्हणत फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला त्यानंतर तिच्या पतीला देखील तिच्याबद्दल बदनामीकारक माहिती देऊन तिच्यासोबत लग्न न करण्याची धमकी दिली. भोसरी येथे धावडेवाडी परिसरात 22 एप्रिल रोजी ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वैभव रामचंद्र सोमवंशी ( इंद्रायणी नगर भोसरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फोन केला आणि तुझे लग्न ठरले आहे हे मला समजले आहे. आता तुझे लग्न कसे होतो तेच बघतो. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्याबाबत सांगून तुझे लग्न मोडतो. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर आपल्या दोघांचे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून तुझी लाईफ बरबाद करतो अशी तरुणीला धमकी दिली.

त्याने वारंवार तरुणीला फोन करून तिच्यासोबतच लग्न करण्याची मागणी केली आणि तरुणीच्या वडिलांना देखील फोन करून तिचे दुसरीकडे लग्न लावू नका अशी धमकी देखील दिली त्यानंतर तरुणीच्या होणाऱ्या पतीला देखील त्याने संपर्क करून फिर्यादीचे फोटो पाठवले आणि तिची बदनामी केली तसेच तिच्यासोबत लग्न करू नको अशी देखील धमकी दिली अखेर फिर्यादी तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.


Spread the love