महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे 2015 साली उघडकीला आली होती. पतीची हत्या करणार्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला दिंडोशी सत्र न्यायालयाने अखेर जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
उपलब्ध माहितीनुसार महिलेचे नाव रीवा असे असून तिचा विवाह बाबू सेलम यांच्यासोबत झाला होता त्यानंतर त्यांना दोन मुले देखील झाली. 16 जुलै 2015 रोजी बाबू याचा मोठा मुलगा कामावरून घरी आला त्यावेळी त्याला सकाळपासून वडील उठलेले नाही हे लक्षात आले. त्याने वडिलांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सरकारी वकील सचिन जाधव यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना रिबा हिचे परिसरातील अभिमन्यु चौधरी नामक युवकावर प्रेम होते मात्र त्यात पतीचा अडथळा होत असल्याने तिने अभिमन्यू याला मदतीला घेत आपल्या पतीची हत्या केली त्यावेळी तिचा लहान मुलगा झोपलेला होता , असे म्हटले होते.
न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर रीवा हिने तिचे प्रेमप्रकरण असल्याचे नाकारले आणि उलट बाबू यांच्या मृत्यूस त्याचा भाऊच जबाबदार आहे असे म्हटले होते. मयत व्यक्तीचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला हे केवळ तिलाच माहित आहे आणि हत्या कोणत्या परिस्थितीत झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी तिची होती मात्र तिने याबाबत काहीच स्पष्ट केले नाही त्यामुळे बाबूचा गळा दाबण्याचा तिचा सहभाग होता असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि त्यानुसार यांना दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.