‘ त्या ‘ प्रकरणात न्यायालयाने पोलिसांना फटकारले , म्हणाले की ?

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या पोलिसांना न्यायालयाने चांगलेच फटकारले असून सदर प्रकार केवळ काल्पनिक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

पोलिसांनी न्यायालयात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकेची आणि पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यावर न्यायालयाने म्हटले की हा सर्व प्रकार काल्पनिक आहे. झालेले प्रकरण कोणत्याहि तत्त्वावर आधारलेले नाही. आरोपींच्या कोठडीसाठी कोणतेही ठोस असे कारण नाही. खास अधिकारांच्या आणि कल्पनाशक्तीच्या आधारे केस बनू शकत नाही. झाला प्रकार हा दुर्दैवी असून संदीप देशपांडे आणि धुरी यांचा जाणीवपूर्वक पोहोचवण्याचा हेतू यात दिसून येत नाही.

भोंगा प्रकरणात मनसे नेत्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी चांगलेच यंत्रणा राबवली होती. त्यावेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेलेले असताना त्यांनी गाडीत बसून पळ काढला होता त्यावेळी एका महिला कर्मचाऱ्याला इजा झाली होती. सोशल मीडियात याप्रकरणी चांगला संताप व्यक्त करण्यात आला होता आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता त्यानंतर ते फरार झाले होते आणि अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर ते समोर आले.