महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे उघडकीला आली असून 29 वर्षीय तरुणीला ‘ तुला रेल्वेत नोकरीला लावतो ‘ असे आमिष दाखवत त्यानंतर आपण लग्न करू असे म्हणत एका व्यक्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्ती रेल्वे स्टेशनमध्ये प्रबंधक म्हणून कार्यरत असून सावदा येथील रहिवासी आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अंकुश किरण मोरे ( राहणार मरी माता मंदिरासमोर भुसावळ ) असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने त्याला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलेले आहे.
अंकुश मोरे याची परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. एका लग्नाच्या कार्यक्रमात दोघे भेटले आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले आणि फोनवर एकमेकासोबत बोलू लागले तेव्हा अंकुश मोरे याने या तरुणीला रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आपण विवाह करू असे देखील तो म्हणाला आणि याच बहाण्याने तिने त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला मात्र त्याच्या बोलण्यातील फोलपणा तिच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली पोलीस ठाण्यात धाव घेत अंकुश मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली.