हिजाब वरून देशात वातावरण पुन्हा तापणार ? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय

कर्नाटक येथील शैक्षणिक संस्थेच्या हिजाब वापरण्यावर निर्बंध मागे घेण्यास नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून सदर प्रकरणी झालेल्या सर्व याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास मान्यता दिलेली आहे.

उच्च न्यायालयाने मागील वर्षी 15 मार्च रोजी शाळेत हिजाब वापरण्यास परवानगी देण्याची मागणी धुडकावून लावली होती. मुस्लिम धर्मात हिजाब वापरणे ही अनिवार्य प्रथा नाही असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले होते मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात बऱ्याच मुस्लिम संघटनांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यामध्ये हिजाब वापरण्याचा अधिकार हा राज्यघटनेतील कलम 21 नुसार गोपनीयतेच्या हक्काच्या कक्षेत येतो, असे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमन, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती कोहली यांच्या खंडपीठाने पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी घेण्यात येईल असे म्हटले असून देशात पुन्हा एकदा राजकीय वातावरण यावरून तापण्याचे संकेत आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने हिजाब वापरण्यास बंदी असल्याने मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना अनंत अडचणींचा सामना करत करावा लागतो अशी मागणी केली होती त्यानंतर आता सुनावणी घेण्याचे निश्चित झाल्यावर सुप्रीम कोर्ट या प्रकरणी काय निकाल देईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.