‘ जुमलाजीवी ‘ सोबतच आता ‘ ह्या ‘ शब्दांना संसदेत बंदी, पर्यायी शब्द शोधून टीका करावी लागणार

संसदेत कामकाज सुरू असताना अनेकदा आरोप-प्रत्यारोप करताना खासदारांकडून शाब्दिक मर्यादा ओलांडल्या जात असल्याने संसदेचे पावित्र्य भंग होते. विधायक कार्यासाठी चर्चा सुरू असताना अनेकदा खासदारांकडून ‘ जुमलाजीवी, बालबुद्धी, शकुनि, जयचंद, लॉलीपॉप, चांडाळ चौकडी, पिठठु अशा शब्दांचा वापर केला जातो त्यामुळे संसदेची आणि पर्यायाने देशाची प्रतिमा डागाळत असल्याने अनेक शब्दांना संसदेत वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली असून असे शब्द उच्चारल्यास खासदाराचे ते असभ्य वर्तन मानले जाणार आहे.

लोकसभा सचिवालय यांनी असंसदीय शब्द 2021 यामध्ये अशा शब्दांची यादी केली असून त्यामध्ये, कमीना, काळे अधिवेशन, दलाल, रक्ताची शेती, चिलम पीने, कोयलाचोर,चरस , गांजा, सांड अशा शब्दांना देखील यापुढे असभ्य वर्तन मानले जाणार आहे. छत्तीसगड विधानसभेने याआधी बॉबकट हेअर, उलटा चोर कोतवाल को डांटे, कावकाव , तळवे चाटणे , तडीपार, तुर्राम खान, अनेक घाटांचे पाणी पिणे अशा शब्दांना या आधीच बंदी घालण्यात आलेली आहे.