पुणे हादरलं..सासू सुनेत झालेल्या मारामारीचा अखेर ‘ दुर्दैवी ‘ अंत

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना पुणे इथे उघडकीस आली असून सासूने घरात स्वयंपाक बनविला नाही अन त्यामुळे मुलीला जेवण मिळाले नाही म्हणून सुनेने सासूचा दोरीने गळा आवळून खून केला आहे. गुरुवारी रात्री चाकण येथे ही घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. सुषमा अशोक मुळे (71, रा.पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून सुवर्णा सागर मुळे (32) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात आधीही किरकोळ कारणावरून वाद होत होते मात्र गुरुवारी दुपारी सून सुवर्णा ही शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे कार्यक्रमासाठी गेली आणि सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. सुवर्णा हिने मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही फक्त भात खाऊ घातला असे सांगितल्याने सुनेने सासूला जाब विचारण्यास सुरु केला.

सासू यावेळी भाकरी करत होती मात्र सुनेने सासूला बाजूला लोटून दिले आणि त्यांच्यात मारामारी सुरु झाली. सुनेने सासूला मारायला सुरु केले आणि राग अनावर झाल्याने घरातील नायलॉन दोरीने सासूचा मागून गळा आवळला मात्र श्वास घेण्यास अडचण आल्याने सासू सुषमा या बेशुद्ध पडल्या. मुलगा सागर हा कामावरुन घरी आल्यावर सुवर्णा हिने पतीला सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. आईला उपचारासाठी त्यानंतर दोघांनीही रुग्णालयात दाखल केले मात्र आईचा मृत्यू झाला होता.

चाकण पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक शेंडकर व इतर पथक रुग्णालयात आले मात्र त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल संशय आल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी याबाबत तपास सुरु केला. तपासात मयत महिलेचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार कथन केला. काही मिनिटात सुवर्ण हिने सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड करत आहेत.