पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार जोरदार सुरू आहे अशीच एक घटना पिंपरी ते उघडकीला आली असून एका महिलेसोबत लग्नापूर्वी काढलेले अश्लील फोटो चक्क तिच्या पतीला पाठवण्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची देखील या महिलेला धमकी देण्यात आली तळवडे येथे मे आणि जुलै महिन्यात ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राहुल कैलास जंगम ( राहणार नाशिक ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून सदर प्रकरणी या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि राहुल यांची लग्नापूर्वी मैत्री होती मात्र तिचे लग्न झाल्यानंतर राहुल याने महिलेच्या पतीला फोन करून ‘ तू तिच्याशी लग्न केलेस आता तुला बघून घेतो ‘, असे देखील तो म्हणाला आणि काही जुने असलेले फोटो पतीच्या मित्राला पाठवून तुझी बदनामी करेल असेही तो म्हणाला त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.