धक्कादायक.. चक्क महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाठवले कॉल गर्ल्सचे रेट , वरून म्हणतोय ‘ नखरा नही करेगी’

Spread the love

देशात मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास देहविक्रय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना असाच अनुभव आला आहे . अर्थात ते एक स्टिंग ऑपरेशन होते, त्यात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली असून चक्क जस्ट डायल सारख्या प्लॅटफॉर्मवरून असा प्रकार सुरु आहे . स्टिंग ऑपरेशन अंतर्गत स्वाती मालीवाल यांना जस्ट डायलवर स्पा मसाजसाठी माहिती मिळवायची होती मात्र त्यांना 150 हून अधिक कॉलगर्ल्सचे दर सांगण्यात आले.

स्वाती मालीवाल यांनी ट्वीट केले आहे की, ‘आम्ही जस्टडायलला कॉल करुन स्पा मसाजची खोटी चौकशी केली, त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे, या व्यवसायाला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे ?’

जस्ट डायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही. दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनाच या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. असा इशाराही मालीवाल यांनी दिला.

दिल्लीत तसेच देशात अनेक ठिकाणी स्पा, मसाज सेंटर, फ्रेंडशिप क्लब या गोंडस नावाखाली हे धंदे सुरु असून पोलीस कारवाई करतात मात्र पुन्हा नव्याने हे व्यवसाय उभे राहत असून चक्क ‘ हैप्पी एंडिंग ‘ , ‘ नखरा नही करेगी ‘ वगैरे विशेषणे देत अशा व्यवसायांचे मार्केटिंग केले जात आहे .


Spread the love