कतरिना कैफच्या लग्नानंतर प्रचंड नैराश्याने घेरले , तिला धडा शिकवायचा म्हणून..

Spread the love

सोशल मीडियावर सेलिब्रिटीला ट्रोल करणे हा प्रकार काही नवीन राहिलेला नाही अनेकदा या प्रकाराला वैतागून काही सेलिब्रिटी सोशल मीडिया देखील सोडून देतात. असाच प्रकार कतरीना कैफ हिच्या सोबत घडलेला असून तिचे लग्न झाल्यानंतर एक व्यक्ती प्रचंड नैराश्यात गेला होता त्यातून त्याने कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केलेली आहे.

मनविंदर नावाच्या व्यक्तीला सोमवारी पोलिसांनी अटक केली असून मूळचा तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे मात्र सध्या तो सांताक्रूझ परिसरात राहत होता . कत्रिना कैफचा तो जबरदस्त फॅन असून तिच्यासोबत आपल्याला लग्न करायचे होते अशी त्याची इच्छा होती त्यातून त्याने सोशल मीडियावर तिला विकी कौशल याच्यासोबत लग्न करू नको, असे देखील अनेकदा कमेंटमध्ये सांगितले होते. कतरीना कैफचे लग्न झाल्यानंतर तो प्रचंड नैराश्यात गेला होता त्यातून त्याने तिचे काही मॉर्फ केलेले फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल केले होते. सदर प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


Spread the love