पुण्यात खळबळ.. अखेर ‘ त्या ‘ व्यावसायिकाचा मृतदेहच आला हाती

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात समोर आलेली असून खंडाळा तालुक्यातील वीर धरण परिसरात नीरा नदीच्या पात्रात पुणे येथील एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. सुरज हनुमंत सुंदर ( वय 42 राहणार कोंढवा पुणे ) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बेवारस कार उभी असल्याने काही जणांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

सुरज सुंदर हे कोंढवा येथील रहिवासी असून त्यांचा जमीन व्यवहार याचा व्यवसाय आहे. बुधवारी ते त्यांच्या राहत्या घरातून पैशाचे काम आहे असे सांगत त्यांची कार घेऊन बाहेर पडले होते त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान व्हिडिओ कॉल करून मी हरलो आहे असे सांगत मुलावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते त्यानंतर मी माझे आयुष्य संपवणार आहे असेही ते म्हणाले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळून आला होता. एका हॉटेलजवळ एक बेवारस स्थितीतील कार नागरिकांना आढळून आली आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आले.


Spread the love