डॉक्टर पूजा करत बसले तर दुसरीकडे दवाखान्याबाहेर मुलाने सोडले प्राण

भाजपची सत्ता असलेल्या मध्यप्रदेशात आरोग्य व्यवस्था चांगली असल्याचे अनेक दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र असून काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या आईला शववाहिका नसल्याने दोन भावांनी चक्क दुचाकीवर आपल्या मयत आईला घरी नेले होते त्यानंतर पुन्हा अशीच एक संतापजनक घटना मध्यप्रदेशात समोर आलेली असून डॉक्टर घरी पूजा पाठ करत असताना दुसरीकडे बर्गी येथील आरोग्य केंद्रात उपचाराअभावी आईच्या कुशीत पडून बालकाचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संजय पंधरे असे या बालकाच्या वडिलांचे नाव असून त्यांचा मुलगा ऋषी ( वय पाच वर्ष ) याला उलटी आणि जुलाब होत असल्याने बर्गी येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते मात्र आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नव्हते त्यामुळे हतबल झालेली आई आणि इतर नातेवाईक तिथेच प्रतीक्षा करत थांबलेले होते. अनेक तास उलटून देखील डॉक्टर वेळेत आरोग्य केंद्रावर आले नाही म्हणून अखेर त्यामुळे ऋषीचा मृत्यू झाला.

काही कालावधीने डॉक्टर आले त्यावेळी त्यांनी आपल्या घरी पत्नीने आदल्या दिवशी व्रत ठेवलेले होते त्यामुळे त्या व्रताची सांगता करायची होती म्हणून आपल्याला येण्यास उशीर झालेला आहे असे अजब कारण दिले. मुलाचे नातेवाईक यामुळे संतप्त झाले आणि त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केले आहेत. वेळेत उपचार मिळाले असते तर आमच्या मुलाचे प्राण वाचले असते असे सांगत त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.