‘ २०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती… ‘

Spread the love

सातत्याने मूर्खपणाची विधाने करून आपले हसू करून घेणाऱ्या कंगनाने नुकतेच ‘ १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते अन खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले ‘ असे बालिश विधान केले होते. तिच्या या विधानावर अभिनेता कमाल आर खान याने जोरदार टीका केली आहे. केआरके बॉलिवूड कलाकारांशी चांगलाच पंगा घेताना दिसत असून त्याने एक पोस्ट शेअर करत बॉलिवूडची क्वीन कंगना रणोत ट्रोल केले आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केले आहे. यात “कंगना देशाच्या स्वातंत्र्याचा संबंध तिच्या स्वातंत्र्याशी जोडते का ? कारण कंगना म्हणते की तिला २०१४ नंतर स्वातंत्र्य मिळाले! त्याआधी ती हृतिक रोशन आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती!”, असे ट्वीट करत केआरकेने कंगनाला ट्रोल केले असून केआरकेचे हे ट्विट चांगलेच पसंत केले जात आहे .

काय म्हणाली होती कंगना ?

‘ देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत ‘


Spread the love