‘ दस का दम ‘ दिसेना , सुंदर कॉईनला न्याय मिळेल का हो ?

दहा रुपयांचे नाणे हे सध्या व्यवहारात अनेक नागरिकांना अडचणीचे ठरत असून या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातही इतर ठिकाणी दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास दुकानदार नकार देत असून हा एक पद्धतीने देशातील मुद्रेचा अपमान आहे. नागरिकांमध्ये हे नाणे चालत नसल्याचा संभ्रम निर्माण झालेला असून ही अफवा रोखण्यासाठी सरकारी पातळीवर देखील उदासीनता पाहायला मिळत आहे.

नगर शहर आणि जिल्ह्यात अनेक दुकानदार दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार देत असून ‘ आम्ही तुमच्याकडून हे नाणे घेतले मात्र आम्ही हे नाणे कुणाला द्यायचे कारण घेणारी व्यक्ती याला नकार देतात ‘ असेही दुकानदार सांगत आहेत अर्थात बँकेमध्ये मात्र हे नाणे स्वीकारले जात आहे जात असून बॅंकेत भरणा करण्यासाठी दहा रुपयाची चिल्लर कोणी न्यायची ? यामुळे देखील दुकानदार सहसा दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत.

सर्व दुकानदारांनी आणि ग्राहकांनी दहा रुपयांचे नाणे स्वीकारावे. सर्व बँकांनी आणि पतसंस्थांनी आपापल्या ठिकाणी नाण्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती केली तर दहा रुपयाच्या नाण्याला मानसन्मान मिळेल. दहा रुपयांची नाणी ही चलनातून बाद झालेली नाहीत. रिझर्व बॅंकेच्या नियमानुसार ती स्वीकारण्यास कुठलीही हरकत नाही. दहा रुपयांचे नाणे अत्यंत सुंदर असून त्याच्यावरील डिझाईन देखील खूपच छान आहे त्यावर कुठलीच बंदी नसून दहा रुपयाचे नाणे स्वीकारून दुकानदारांनी नागरिकांना सहकार्य करावे , अशीही अनेक ग्राहकांची मागणी आहे.