साडेतीन वर्षाच्या मुलीचे कपडे बदललेले आढळले म्हणून चौकशी , तपास सुरु असतानाच..

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नर्सरीमध्ये शिकत असलेल्या एका चिमुकलीवर शाळेच्या नराधम बसचालकाने बलात्कार केल्याचा प्रकरण प्रकार समोर आलेला आहे. पोलिसांनी चालकासह एका महिला सहाय्यकाला देखील अटक केलेली आहे. गुरुवारी ही घटना घडलेली होती त्यावेळी ही महिला सहाय्यक देखील बसमध्ये होती मात्र तिने विरोध केला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या चिमुरडीचे अवघे साडेतीन वर्ष असून गुरुवारी शाळेनंतर ती घरी आली त्यावेळी तिचे कपडे कोणीतरी बदलल्याचे आईच्या लक्षात आले म्हणून आईने तिला विचारले तसेच तिचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडे देखील या संदर्भात चौकशी केली त्या दोघांनीही मुलीचे कपडे बदलण्यासाठी आम्ही सांगितले नाही असे सांगितल्यानंतर मुलीने गुप्तांगात वेदना होत असल्याचे सांगितले म्हणून पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी तिने हा धक्कादायक प्रकार कथन केला.

शाळेच्या बसचालकाने बसमध्ये आपल्यासोबत नको तो प्रकार केला आणि त्यानंतर आपले कपडे बदलले असे सांगितल्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. सदर प्रकारानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण दडवून ठेवल्याचा आरोप केला जात आहे.