शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात चक्क ‘ सेक्स तंत्र ‘ शिबीर , सोशल मीडियात संताप

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक नवसंकल्पना उदयास येत असून अशीच एक संकल्पना एका संस्थेच्या मनात आल्यानंतर त्याची सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात सध्या एक जाहिरात केली जात असून ‘ सेक्स तंत्र ‘ या नावाने एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येणार आहे. एक ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान हे शिबिर होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी थोडीथोडके नव्हे तर तब्बल पंधरा हजार रुपये घेण्यात येणार आहे. नवरात्रीच्या दरम्यानच हा प्रकार घडणार असल्याने पुण्यात या आयोजकांच्या विरोधात संताप पहायला मिळत आहे.

लैंगिक शिक्षणाची गरज अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे हे शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेने सांगितले आहे मात्र घेण्यात येत असलेली भरभक्कम रक्कम तसेच जाहिरातीचे करण्यात येत असलेले स्वरूप यावरून हा काहीतरी भलताच प्रकार असल्याचा संशय असल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झालेली आहे. जाहिरातीच्या पोस्टरवरून नक्की हा सेक्स तंत्र प्रकार काय आहे ? याची मात्र सोशल मीडियात सध्या चर्चा सुरू आहे.