मामीच चुकीचं पाऊल पडलं , अखेर ‘ त्या ‘ प्रकरणात दोघांनाही बेड्या

देशात एक खळबळजनक घटना मध्यप्रदेशात समोर आलेली असून एका तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलेले आहे. इंदोर येथील संगमनगर येथे सोमवारी एका गुन्ह्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तरुणाचे दोन्ही हात पाय बांधलेले होते त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि समोर जे सत्य आले ते ऐकून पोलिसांचा देखील विश्वास सुरुवातीला बसला नाही. मयत व्यक्ती याची पत्नी आणि त्याचा भाचा यांनी हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देवेंद्र अग्रवाल असे मयत तरुणाचे नाव असून देवेंद्र याच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली आहे. देवेंद्र आणि त्याच्या पत्नीने हा यांना दोन मुले असून देवेंद्र आणि नेहा हे तेरा महिन्यांपासून वेगळे राहत होते. दरम्यानच्या काळात नेहा हिचे देवेंद्र यांचा भाचा असलेला विकी याच्यासोबत प्रेम संबंध सुरू झाले या प्रकरणाची खबर देवेंद्र याला लागल्यानंतर यांच्यात वाद सुरू झाले म्हणून संतप्त पत्नीने विकीला हाताशी घेत देवेंद्र यांचा गळा दाबून खून केला.

देवेंद्र सोमवारी पत्नीच्या घरी गेला होता त्यावेळी तिथे विकी बसलेला पाहायला मिळाला त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाल्यावर नेहा आणि विकी यांनी देवेंद्र यांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह पोत्यात भरला आणि एका रिक्षामध्ये संगम नगर परिसरात आणून रिकाम्या शेतात फेकून दिला. प्रकरण समोर येताच एकच खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांना विकी आणि नेहा यांच्यातील प्रेमप्रकरणाचा क्लू मिळाला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली असून आमच्या प्रेमप्रकरणात देवेंद्र हा अडथळा ठरत होता म्हणून हा प्रकार केला असे सांगितले आहे. इंदूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयविर भदोरिया यांनी ही माहिती दिली असून महिलेचे तिच्या भाच्यासोबत अनैतिक संबंध होते त्यात पती अडथळा ठरत होता म्हणून तिने त्याच्या मदतीने खून केला असे समोर आलेले आहे.