.. म्हणून 43 वर्षांमध्ये तब्बल 53 निकाह , एक निकाह फक्त रात्रीपुरताच

Spread the love

सोशल मीडियावर अनेक विवाहांची जोरदार चर्चा होत असते अशीच एक चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून एका व्यक्तीने तब्बल 43 वर्षांमध्ये तब्बल 53 निकाह केलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याविषयी जेव्हा त्याला विचारले गेले त्यावेळी त्याचे उत्तर देखील तितकेच धक्कादायक होते. आपण केवळ मनशांतीसाठी हे निकाह केलेले आहेत असे त्याने म्हटले आहे.

सदर प्रकरण सौदी अरेबियातील असून या व्यक्तीने 43 वर्षांमध्ये 53 वेळा निकाह करण्याचा विक्रम केलेला आहे. आपण शांततेच्या शोधात होतो मात्र ती आपल्याला कुठेच मिळत नव्हती म्हणून आपण हे निकाह करून पाहिले असे म्हटले आहे. पहिल्यांदा निकाह केला त्यावेळी आपले वय 20 वर्ष होते मात्र पत्नी सहा वर्षांनी आपल्यापेक्षा मोठी होती त्यामुळे आपल्याला मनःशांती लाभली नाही असेही त्याने म्हटले आहे.

अबू अब्दुल्ला असे या व्यक्तीचे नाव असून ज्यावेळी मी पहिल्यांदा निकाह केला तेव्हा इतके निकाह करेल असे मलाही वाटले नव्हते. पहिल्यांदा निकाह केला तेव्हा मला अत्यंत आरामदायक वाटले आणि त्यानंतर मुलेही झाली मात्र काही कालावधीत आमच्या नात्यात अडचणी सुरू झाल्या म्हणून तेविसाव्या वर्षी मी पुन्हा निकाह करण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक वेळी निकाह करताना एक चांगली स्त्री शोधणे असा माझा हेतू होता मात्र प्रत्येक वेळी मला योग्य अशी महिला मिळाली नाही त्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य ढासळत होते म्हणून मी मन शांतीच्या शोधात होतो. मला प्रत्येक निकाह हा अत्यंत कमी वेळ टिकणारा मिळाला म्हणून कधी ना कधीतरी आपल्या आपल्याला मनशांती मिळेल या आशेने आपण हे निकाह केले असेही म्हटले आहे. आपला सर्वाधिक कमी टिकणारा निकाह हा अवघा एका रात्रीचा होता, असे देखील त्याने म्हटले आहे.


Spread the love