‘यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही’; निर्मात्याची घोषणा

Spread the love

देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभर तीव्र पडसाद उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांनी रविवारी तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला. कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केलं. स्वातंत्र्य मिळवण्यााचा प्रयत्न करणाऱ्या योद्धांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. विक्रम गोखलेंच्या या विधानावरून मत-मतांतरे होत असताना त्यांच्यासोबत भविष्यात कामच करणार नसल्याचं मराठी निर्माते निलेश नवलाखा यांनी जाहीर केलं.

‘मी विक्रम गोखलेंबरोबर काम केलं आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना राणावत जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,’ असं ट्विट नवलाखा यांनी केलं.


Spread the love