नवनीत राणा यांना अटक होण्याची शक्यता , वडिलांवरही गुन्हा दाखल

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत सापडलेल्या अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखीन भर पडलेली असून त्यांच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. मूळ तक्रारदार जयंत वंजारी यांनी सत्र न्यायालयात धाव घेत राणा यांच्या अर्जाला आक्षेप घेतला असून 18 ऑक्टोबरला सुनावणी आहे.

नवनीत राणा यांनी ह्या ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीतील आहोत असा दावा करून ही निवडणूक लढवली मात्र शाळा सोडल्याचा दाखलामध्ये जातीच्या ठिकाणी चक्क फेरफार केल्याचे आढळून आले होते. नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना दुसऱ्यांदा वॉरंट बजावलेले असून सत्र न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली आहे.