‘ शेण खातोस का ? ‘ असा शब्द सहसा एखाद्या मूर्ख व्यक्तीबद्दल उच्चारला जातो मात्र प्रत्यक्षात असे कोणी करेल यावर विश्वास बसत नाही मात्र असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून या व्हिडिओत डॉक्टर चक्क शेण खात आहे . शेणाचं महत्त्व सांगणाऱ्या या डॉक्टरांचं नाव मनोज मित्तल असून सदर डॉक्टर हे कर्नालचे रहिवासी असल्याचे समजते . एमबीबीएस झालेले मनोज डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून गोमूत्र पित आहेत आणि शेणही खात आहेत.
मनोज मित्तल यांच्या म्हणण्यानुसार , गायीच्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन बी असतं.त्यामुळे रेडिएशनपासून बचाव होतो. मोबाईल, एसी, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रिक उपकरणांमधून रेडिशन निघतं. त्यामुळे कर्करोगासारखे आजार होतात मात्र गायीचं शेण खाल्ल्यानं रेडिएशनचा परिणाम कमी करता येऊ शकतो. गर्भवतीनं प्रसुतीदरम्यान गायीचं शेण खाल्ल्यास प्रसुतीवेळी फारसा त्रास होत नाही आणि शेण खाल्ल्यामुळे अनेक आजार बरे होतात
मनोज मित्तल बालरोगतज्ज्ञ असून कर्नालमध्ये त्यांचं मोठं रुग्णालय आहे. आपण कायम जमिनीवर झोपतो आणि एसीचा वापर करत नाही. गायीच्या शेणात २८ टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, असेही ते पुढे म्हणाले आहेत.मित्तल यांच्या दाव्यात आतापर्यंत कोणतेही तथ्य कधीच आढळून आलेले नाही त्यामुळे असे अघोरी प्रकरण करणे जीवावर देखील बेतू शकते.
मनोज मित्तल यांचा व्हिडीओ व्हायरल होताच विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी मनोज यांच्या पदवीवर शंका उपस्थित केली. तर काहींनी मनोज यांचा दावा खरा वाटत आहे. सोशल मीडियावर मित्तल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या डॉक्टरने आरएसएस सारखी वेशभूषा धारण केलेली असल्याचे या डॉक्टरची सध्या जोरदार चर्चा होते आहे.