देशात गुन्हेगारी व्यक्तींच्या लोकांकडून हनी ट्रॅप हे एक झटपट पैसे मिळवण्याचे एक साधन बनू पाहत आहे . मुंबई गुन्हे शाखेने अशाच एका टोळीचा पर्दाफाश केला असून त्यात चक्क एका बॉलिवूडच्या अभिनेत्याची पत्नी आढळून आल्याने एकच खळबळ उडालेली आहे . सपना उर्फ लुबना वजीर असे या आरोपी महिलेचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे तर दोन पुरुष मॉडेल आणि एक महिला मॉडेल परागंदा झाल्या आहेत.
2016 साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याची गोव्यातील एका व्यक्तीशी ओळख झाली होती. 2019 मध्ये हा व्यापारी मुंबईतील अंधेरी परिसरात व्यावसायिक कामासाठी आला होता त्यावेळी आरोपीने व्यापाऱ्याची फायानान्सरसोबत मीटिंग असल्याचं सांगून आपल्या दोन मैत्रिणींना एका पंचतारांकित हॉटेलच्या आलिशान खोलीत भेटायला पाठवले मात्र आरोपीने आपण बिझी असून येणं शक्य नसल्याचा खोटा निरोप फायनान्सरच्या नावे दिला.त्यामुळे हा व्यापारी आणि अन्य दोन महिला हेच आलीशान खोलीत होते .
दोन्ही महिलांनी व्यापाऱ्यासोबत थोडा वेळ गप्पा मारुन खोलीतच जेवणाची ऑर्डर दिली आणि त्यानंतर एक महिला काहीतरी बहाणा करून निघून गेली मात्र त्यानंतर हा व्यापारी आणि एकच महिला आत होते. आत असलेली महिला वॉश रूम मध्ये गेली आणि थोड्या वेळाने बाहेर गेलेल्या महिलेने येऊन दारावरची बेल वाजवली असता व्यापाऱ्याने दरवाजा उघडला आणि नेमके त्याच वेळी वॉशरुममध्ये गेलेली महिला निर्वस्त्र अशी बाहेर आली आणि तिने व्यापाऱ्याने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे रडारड सुरु केली.
सदर प्रकरण नंतर पोलिसांपर्यंत पोहचले असता तपास सुरु झाला आणि त्यात बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी सपना उर्फ लुबना वजीर हीच यामागची मास्टरमाइंड असल्याचे आढळून येताच पोलिसांनी तिला बड्या ठोकल्या. लुबना वजीर उर्फ सपनाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिच्याकडे 29 लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली तर 7 मोबाईल फोन, 2 कार आणि 8 लाखांहून अधिक किमतीचे दागिने सापडले आहेत .
सपना उर्फ लुबना वजीर मुंबईतील जुहू, वांद्रे, लोखंडवाला ते गोव्यापर्यंत किटी पार्ट्या आणि अनेक कार्यक्रम करत असे. या पार्ट्यांमध्ये लोकांशी मैत्री करुन आर्थिक सक्षम अशा सावजाचा शोध घेतला जात असे आणि वरिलप्रमाणे त्यांना केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून मोठी खंडणी वसूल केली जात असे. पोलीस प्रत्येक पीडितापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून सदर टोळीकडून फसवल्या गेलेल्या व्यक्तींना समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.