गुलाबी नोट काळी झाली का ? ,बाजारातून गायब झालीय दोन हजारांची नोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली त्यावेळी आपण हे काळा पैसा रोखण्यासाठी आणि आणि दहशतवाद मिटवण्यासाठी करत आहोत असे म्हटले होते मात्र प्रत्यक्षात यातील काहीही झालेले नाही आणि देशातील अनेक उद्योग देशोधडीला लागले. बेरोजगारीचे प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणात वाढले आणि नागरिकांचे जीवनदेखील असह्य झाले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटामध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा साठवलेला आहे म्हणून आपण हे पाऊल उचलले असे सांगण्यात आले मात्र त्याच वेळी दोन हजार रुपयांच्या नोटा देखील बाजारात आलेल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत दोन हजार रुपयांच्या नोटा देखील बाजारातून गायब झालेल्या असून नोटबंदीनंतर या नोटांची चांगली चलती होती मात्र त्या देखील आता बाजारातून गायब झालेल्या आहेत.

अनेक नागरिकांना दोन हजार रुपयांची नोट पहायला देखील मिळत नसून बँकेत देखील या नोटा आढळून येत नाहीत. क्वचित एखादा दुसरा ग्राहक ही नोट घेऊन येत असतो मात्र नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची सहज नोट उपलब्ध होत होती ती आता दिसून येत नाही. गुलाबी नोटा गेल्या कुठे हा देखील एक प्रश्न उपस्थित होत असून या दोन हजार रुपयांच्या नोटामध्ये परत काळा पैसा एकवटला असल्याची देखील चर्चा आहे . नोटबंदी सुपरफ्लॉप झाल्यानंतर पुन्हा नोटबंदीसारखे पाऊल केंद्र सरकार उचलणार नाही म्हणून अनेक जणांनी आपला काळा पैसा दोन हजार रुपयांच्या नोटामध्ये साठवलेला असल्याची देखील चर्चा सध्या सुरू आहे.

रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केले असल्याचे जाहीर केले होते मात्र सध्याच्या चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा कुठे गेल्या ? हा देखील एक प्रश्न असून बँकांमध्ये देखील क्वचितच या नोटा आढळून येतात तर नागरिकांच्या हातात सहजासहजी दोन हजार रुपयाची नोट दिसत नाही . नोटबंदी सारखे कठोर पाऊल पुन्हा उचलण्यात येणार नाही या आशेने बाजारातील काळा पैसा दोन हजार रुपयांच्या नोटामध्ये एकवटला असल्याची देखील चर्चा सध्या जोर पकडत आहे.