‘ सबबी सांगू नका ‘ , न्यायालयाने पोलिसांना खडसावले

Spread the love

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत पोलिसांनी का केली नाही ? असा संतप्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केलेला असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सदर कारवाईबाबत लोकसभा अध्यक्ष यांना देखील पत्र लिहिले असून न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा या अडचणीत सापडलेल्या आहेत.

2019 ची लोकसभा निवडणूक राखीव कोट्यातून लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी बोगस कागदपत्रे बनवून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र चक्क खाडाखोड करून मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुख्य तक्रारदार जयंत वंजारे यांनी सत्र न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला होता त्यानंतर मुंबईतील शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली त्यावेळी वंजारी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर न्यायाधीश मोकाशी यांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. कारवाईसाठी अधिक वेळ देण्याची पोलिसांनी मागणी केली त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईबाबत विचारणा केली आहे.

न्यायालयाने पोलिसांना खडसावत म्हटले आहे की नवनीत राणा यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्या अमरावती जिल्ह्यात दौरे करत आहेत. मुंबईतील त्यांच्या पोलिसांनी मुंबईतील त्यांच्या पत्त्यावर घरी गेलो होतो मात्र त्या तिथे नव्हत्या असे सांगण्यात आले त्यानंतर न्यायालयाने, ‘ नवनीत राणा मुंबईत नाहीत आणि त्या महाराष्ट्राबाहेर तर गेल्या नाहीत ना मग त्या राज्यात दौरे कसे करत आहेत तुम्हाला त्या कशा सापडत नाहीर त्यांचा शोध घ्या सबबी सांगू नका कारवाई करा ‘ अशा शब्दांत पोलिसांना खडसावले आहे.


Spread the love