महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून कोल्हापूर येथील एका व्यापाऱ्याला मुंबई येथे नेऊन हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याची घटना ताजी असतानाच अशाच स्वरूपाची दुसरी एक घटना कोल्हापूर येथील व्यापारी व्यक्तीसोबत घडलेली आहे. कोल्हापूर येथील कापड व्यापाऱ्याला अडीच लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी कोल्हापूर येथे उघडकीस आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार संबंधित तरुणाला सोशल मीडियावर त्याचे फोटो अपलोड करण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण केल्यानंतर त्याच्या जवळील रोकड आणि दागिने लुटण्यात आले त्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली मात्र या सर्व प्रकारात अल्पवयीन मुलगी मात्र फरार झाली आहे . याच मुलीने या व्यापाऱ्यांशी संपर्क साधत हळूहळू त्याच्या सोबत व्हाट्सअप वर मैत्री केली आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढले.
अटक केलेल्यांमध्ये सागर पांडुरंग माने, सोहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटंगी, उमेश श्रीमंत साळुंके, आकाश मारुती माळी, लुकमान शकील सोलापूरे , सौरभ गणेश चांदणे व विजय रामचंद्र गवडा ( सर्वजण राहणार कोल्हापूर ) यांचा समावेश आहे.