नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर

Spread the love

नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे सरकार यांच्याकडे गहाण ठेवलेला असल्याने सुपारी घेऊन त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे , अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज ठाकरे यांना खडे बोल सुनावले आहेत.

राज ठाकरे यांनी मुंबई येथील मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले असून, ‘ राज ठाकरे यांनी राहुल गांधींवर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळणारा मोठ्या प्रमाणातील प्रतिसाद हेच असून एक व्यक्ती चालत संपूर्ण भारत जोडायला निघालेला आहे. त्याला देशभरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत सर्व क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उद्योजक आणि जनता स्वतःहून जोडली जात आहे हे राज ठाकरे यांना पहावले जात नाही त्यामुळे ते अशी टीका करत आहेत , असे म्हटलेले आहे.

भाई जगताप पुढे म्हणाले की, ‘ राज ठाकरे यांनी भारत तर सोडा पण महाराष्ट्र देखील संपूर्णपणे पाहिला नसेल. मनसे हा संपलेला पक्ष आहे. राज ठाकरे यांच्या वेळोवेळी भूमिका बदलत असतात त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे. राज ठाकरे हे नकलाकार आहेत म्हणून त्यांना राहुल गांधी यांच्या आवाजात आर डी बर्मन दिसणार. राजकारणात यश मिळत नसल्याने सध्या ते चित्रपटात आवाज देण्याचे काम करत आहेत , ‘ असा देखील टोला भाई जगताप यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.


Spread the love