‘ तुझी का आमची ? ‘, अनैतिक संबंधातून चार वृद्धांनी केली पाचव्या वृद्धाची हत्या

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यात समोर आली असून आस्थाना गावात एका ३० वर्षीय विधवा महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवण्यावरून चार वयोवृद्धांनी पाचवा 75 वर्षीय वयोवृद्ध यांची हत्या केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात महिलेचाही सहभाग असून सर्व आरोपी हे साठ वर्षाच्या पुढील आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर विवाहित महिला ही एका पॉलीटेक्निक कॉलेजजवळ आपली चहाची टपरी चालवत होती. सदर उपचार वयोवृद्ध हे तिथे चहा प्यायला जायचे त्यावेळी त्यांची या महिलेशी ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. सदर महिला प्रत्येकाचीच संबंध ठेवून असल्याने त्यांच्यात वाद होत नव्हते मात्र त्यांच्यात पाचवा वयोवृद्ध असलेला त्रूपिक शर्मा याची या महिलेशी ओळख झाली त्यामुळे इतर चार जणांनी महिलेला जाब विचारला त्यावेळी तिने चारही जणांना आपल्या हाताशी धरत शर्मा याला आपल्या घरी नेले आणि बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला.

शर्मा मयत झाल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला मात्र मयत मुलाने पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळी हा प्रकार समोर आला. कृष्णनंदन प्रसाद ( वय 75 ) , सूर्यमनी कुमार ( वय 60), वासुदेव पासवान, बनारस प्रसाद अशी आरोपींची नावे आहेत.