सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणीसोबत लग्न केलेल्या नवरदेवाला मोठा दिलासा मिळाला असून याआधी नवरदेव असलेला अतुल अवताडे याच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील या घटनेची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र न्यायालयाकडून अतुल अवताडे यास मोठा दिलासा मिळालेला आहे.
न्यायालयाकडून पोलिसांना या दाम्पत्याची चौकशी करण्यासाठीचा अर्ज न्यायालयाने नाकारलेला असून पोलिस तपासाचा मार्ग त्यामुळे बंद झालेला आहे. दोन्ही बहिणींशी एकत्रित लग्न केल्यामुळे पत्नीच्या विरोधाचा प्रश्न उरलेला नाही त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार देत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही या लग्नाची कायदेशीर नोंद होत असल्याने दुसरे लग्न हे अवैध ठरत नाही, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई येथील पिंकी आणि रिंकी या दोन तरुणी आयटी इंजिनिअर असून त्यांनी विवाह केलेला तरुण हा अंधेरी येथील रहिवासी आहे. सदर तरुणी ह्या जुळ्या बहिणी असून त्यांची आवडनिवड देखील सारखीच आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या आईला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले होते त्यावेळी घरी कोणी दुसरा पुरुष नसल्याने अतुल याने त्यांची मदत केली त्यावेळी त्यातील एकीचे अतुल याच्यावर प्रेम जडले. दोन्ही बहिणी या लहानपणापासून एकत्र राहत असून आम्ही वेगळे राहू शकत नाही अशी परिस्थिती असल्याने दोघींनीही त्याच्याशीच लग्नाचा आग्रह धरला होता आणि त्यानंतर एकाच मांडवात हा विवाह पार देखील पडलेला होता मात्र अवघ्या काही तासात या विवाहाला कायद्याचे ग्रहण लागलेले आहे .