स्वतःची बायको प्रियकराच्या खोलीत रात्रंदिवस पडून अन..

Spread the love

एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण महाराष्ट्रात सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एका व्यक्तीने आपले प्राण गमावले आहेत. अमरावती इथे ही घटना समोर आलेली असून पत्नी सोबत राहत असलेल्या लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील पार्टनरचा खून करण्यात आलेला आहे. अमित नारायण उपाध्याय ( वय अडोतीस राहणार सातेफळ चांदुर रेल्वे ) असे मयत व्यक्तीचे नाव असून रेल्वे पोलिसांनी एक व्यक्ती आणि त्याच्या दोन मुलांना अटक केली आहे. अमित उपाध्याय हा एका 45 वर्षीय महिलेसोबत मागील एक वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता

सदर महिला ही विवाहित असून अमित याच्यासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर कुटुंबापासून तिची ताटातूट झाली होती त्यामुळे महिलेचा पती आणि तिची दोन्ही मुले तिच्यावर आणि तिच्या प्रियकरावर खार खाऊन होती. वारंवार सांगून देखील महिला सासरी नांदण्यास येत नसल्याने अखेर पतीने आपल्या मुलाला हाती घेत तिच्या प्रियकराचा खून करण्याचे ठरवले आणि त्यानंतर त्याचा खून केला. मयत व्यक्तीच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहेत.

अमित हा 20 डिसेंबर रोजी रात्री एक वाजता आरोपीच्या घरी गेलेला होता त्यावेळी तिथे त्याचा वाद झाला आणि त्यानंतर त्याच्या प्रेयसीचा पती आणि मुले यांनी त्याला दगड आणि बांबूच्या काठ्यानी त्याला मारहाण केली अन त्यानंतर त्याचा मृत्यू झाला . तो मयत झाल्यानंतर त्यांनी त्याला फेकून दिले आणि त्यानंतर ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.


Spread the love