प्रेमविवाह केलेला पती ‘ गुणी ‘ समजून सासरी पाठवला अन..

Spread the love

bride

देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पती चक्क त्याच्या लहान मेहुणीसोबतच पळून गेलेला आहे. उत्तर प्रदेश येथील अमरोहा येथील हे प्रकरण असून धक्कादायक बाब म्हणजे त्याचा पत्नीसोबत प्रेमविवाह झालेला होता त्यानंतर त्याची मेहुणीसोबत ओळख झाली आणि अचानकपणे त्या दोघांनी पलायन केले.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे सहा महिन्यापूर्वी एका व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न केले होते आणि त्यानंतर ते काही दिवस पती-पत्नी म्हणून एकत्र राहिले मात्र दरम्यानच्या काळात या पतीचे पत्नीच्या लहान बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यानंतर सासरच्या घरी त्याचे जाणे येणे देखील वाढले मात्र पत्नीचा आपल्या बहिणीवर विश्वास होता त्यामुळे तिला कुठलीच शंका आली नाही.

दोन दिवसांपूर्वी तो सासरच्या घरी पोहोचला त्यानंतर सासरचा पाहुणचार घेतल्यानंतर आपल्या बायकोकडे जाण्याऐवजी तो चक्क मेहुणीसोबत फरार झाला आपली . बहीण ही आपल्या पतीसोबत फरार झाल्याची माहिती समजल्यानंतर पत्नी तात्काळ सासर सोडून माहेरी आली अन दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण झाले. पती हा आता पहिल्या पत्नीला घटस्फोट घेऊन मेहुणीसोबत संसार करायचा आहे असे सांगत असल्याने प्रकरण पंचायतीपुढे चर्चेला ठेवण्यात आलेले आहे.


Spread the love