शारीरिक सुखासाठी ड्रममध्ये भरून प्रियकर जंगलात नेला अन..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात बालकल्याण समितीच्या एका सदस्याची हत्या करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या विवाहित प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून ही हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह तुकडे करून एका ड्रममध्ये भरून तब्बल 60 किलोमीटर असलेल्या जंगलात टाकून दिला अन तिथे त्याचा चेहरा देखील त्यांनी जाळला आणि त्यानंतर तेथून पळ काढला.

उपलब्ध माहितीनुसार, चंद्रभूषण ठाकूर ( वय 55 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते बुधवारपासून बेपत्ता झाले होते. बालकल्याण समितीचे ते सदस्य असून त्यांची मैत्रीण असलेली लभीनी साहू हिने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून ठाकूर यांच्या पत्नीला फोन करून ते बेपत्ता झाले असल्याचे सांगितले होते त्यानंतर चंद्रभूषण यांच्या नातेवाईकांनी पोलिसात फिर्याद दिली आणि पोलिस तपासाला सुरुवात झाली.

पोलिसांनी सदर प्रकरणी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यामध्ये त्यांची प्रेयसी असलेली लभीनी साहू ही एका टू व्हीलरवर ड्रममध्ये काहीतरी घेऊन जाताना पोलिसांना आढळून आली त्यानंतर पोलिसांनी तिला तपासासाठी बोलावले त्यावेळी तिच्या बोलण्यात विसंगती आढळून आली सोबतच चंद्रभूषण यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन हे तिच्याच घरात असल्याचे आढळले.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर लभीनी साहू हिचे मोबाईल लोकेशन आणि ति ज्याच्यासोबत संपर्कात होती त्यांचे लोकेशन ट्रेस केले आणि राजनांदगावपासून 60 किलोमीटरवर असलेल्या रतलाम बोरतलाब येथील एका जंगलात घटना घडली त्यावेळी त्यांचे लोकेशन आढळून आले. सीसीटीवी फुटेज आणि एक्टिवा गाडीवर तिचे संशयास्पद वर्तन पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तिच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

पोलिसांची खात्री पक्की झाल्यानंतर त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिला विचारणा सुरू केली त्यावेळी तिची चांगलीच भंबेरी उडाली. आपण आपला प्रियकर याला सोबत घेऊन चंद्रभूषण ठाकूर यांची हत्या केल्याची कबुली दिली. नूतन साहू असे या महिलेच्या दुसऱ्या प्रियकराचे नाव असून त्याचे वय अवघे 25 वर्षे आहे. चंद्रभूषण ठाकूर यांचे वय जास्त होते आणि ते शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्याला त्रास द्यायचे म्हणून दुसऱ्या प्रियकराला आपण हाताशी घेऊन त्यांचा खून केला असे तिने म्हटले आहे.


Spread the love