पुण्यात उच्चभ्रू महिलेला आधी कॉफी पाजली अन त्यानंतर ..

Spread the love

पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून भरदिवसा एका महिलेला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आलेला आहे. सदर महिला हॉटेल व्यावसायिक असून हॉटेल व्यवसायाची चर्चा करण्याच्या बहाण्याने 36 वर्षीय महिलेला घरी बोलावण्यात आले होते. पुण्यातील खराडी परिसरात ही घटना उघडकीला आली असून चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपी अजयसिंग विजयसिंग ठाकूर ( वय 31 ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

पीडित महिला ही केटरिंगचा व्यवसाय करत असून आरोपी सोबत तिची ओळख एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झालेली होती. कोरोना काळात व्यवसाय बंद पडल्यामुळे आरोपी हा कामाच्या शोधात होता त्यावेळी एका मित्राने त्याला फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर दिलेला होता त्यामुळे त्यांची ओळख झाली आणि घटना घडली त्याच्या आधीपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.

एकत्र हॉटेल व्यवसाय करू असे त्यांचे ठरलेले होते म्हणून 3 ऑक्‍टोबर रोजी दुपारी आरोपीने या महिलेला आपण या संदर्भात चर्चा करू असे सांगून त्याच्या घरी बोलावले होते. घरी आल्यानंतर त्याने कॉफीमध्ये गुंगीचे औषध देत या महिलेला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. सदर घटना महिलेच्या लक्षात आल्यानंतर ती तात्काळ तिथून निघून घरी आली आणि त्यानंतर चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.


Spread the love