एक खळबळजनक असे प्रकरण सध्या बिहार इथे चर्चेत आले असून आपल्या पतीला पत्नीचे बाहेरील प्रेमसंबंध लक्षात आल्यानंतर या पतीने जे काही केले त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. बिहार मधील नया टोला परिसरातील हे प्रकरण असून रामराज नावाच्या तरुणाने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडले होते मात्र त्यानंतर त्याने जे काही केले त्याबद्दल आता उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
रामराज याचा दोन वर्षांपूर्वी रुपा कुमारी नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह झालेला होता. त्याचा मिठाई बनवण्याचा व्यवसाय असून लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्याला एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली मात्र तो बाहेर तो कामकाजासाठी बाहेर गेला. पती परगावी गेल्यानंतर त्याची पत्नी एकाकी पडली आणि त्याच दरम्यान तिचे पाटणा येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. पती बाहेरच्या शहरात असताना ती तिच्या प्रियकराला घरी बोलवायची आणि त्यानंतर दोघे तिच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असत.
रविवारी अचानक पती आला त्यावेळी या प्रेमी युगुलाला या प्रकाराची कल्पनाच नव्हती मात्र दरवाजा उघडल्यानंतर त्याला जे काही दिसले ते पाहून तो हादरून गेला. रामराज याने दरवाजा उघडला यावेळी त्यांची पत्नी रुपाकुमारी ही तिच्या प्रियकरासोबत विवस्त्र अवस्थेत आढळून आली मात्र रामराज याने आरडाओरडा न करता बाहेरून कडी लावून घेतली आणि दोघांनाही पोलिसाच्या ताब्यात दिले.
पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे तिचे मागील सहा महिन्यांपासून या प्रियकरावर प्रेम असून आता त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा तिने व्यक्त केली त्यानंतर या पतीने तिच्या म्हणण्याचा आदर करत तिचे या प्रियकरासोबत लग्न लावून दिले असून कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर ही पत्नी आता तिच्या प्रियकराच्या घरी नांदायला जाणार आहे.