पुणे हादरलं..व्हाट्सअप ग्रुपमधून काढल्याने ऍडमिनची कापली जीभ

Spread the love

सुशिक्षित आणि शांत शहर समजले जाणाऱ्या पुण्यात अनेक खळबळजनक अशा घटना उघडकीला येत असून अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे. सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप मधून काढल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने एका व्यक्तीने ऍडमिन असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर बुक्की मारून त्याला जखमी केले आहे. दाताने जीभ कापली गेल्याने या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , प्रीती किरण हरपळे ( वय अडोतीस राहणार फुरसुंगी ) असे तक्रारदार महिला यांचे नाव असून त्यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली असून सुरेश पोकळे, सुयोग शिंदे, अनिल मस्के, शिवराम पाटील, किसन पवार या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी महिला या सोसायटीच्या अध्यक्ष असून सुरेश पोकळे याने फिर्यादी महिलेचे पती किरण हरपळे यांना तुम्ही मला सोसायटीच्या ग्रुप मधून का काढले ? असा प्रश्न विचारला. यासाठी तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हणत चर्चेसाठी बोलावले आणि त्यांना ठोसा मारला त्यामुळे त्यांची जीभ कापली गेली असून त्यांनी पोलिसात धाव घेत आरोपी व्यक्तींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे .


Spread the love