नागरिकांनी ओरडून ओरडून सांगितले पण अखेर ‘ नको ते ‘ घडलं

सध्या तरुणाईला कमरेला फोन अन कानात हेडफोन याचे मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे . अनेकदा डोळे मोबाईलवर आणि कान हेडफोनमध्ये अडकलेले यामुळे दिसणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टी गायब होत असल्याने अपघात देखील झालेले आहेत अशीच एक घटना हिंगणा येथे समोर आलेले असून एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या तरुणीला भरधाव रेल्वेने चिरडून टाकलेले आहे. त्यात तिचा मृत्यू झालेला असून बुधवारी सकाळी ही घटना हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरती मदन गुरव ( वय 19 राहणार सातोना जिल्हा भंडारा ) असे मयत मुलीचे नाव असून ती हिंगणा तालुक्यातील तिच्या मावशीकडे राहायला होती. इंजीनियरिंगच्या प्रथम वर्षाला ती शिकत होती त्यावेळी ती गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ आलेली होती आणि रेल्वे फाटकाजवळील रुळावरून निघाली असताना कुणाशी तरी बोलत चाललेली होती. तिचे इतरत्र अजिबातही लक्ष नव्हते.

आपण रेल्वे फाटकावर आहोत कुठल्याही क्षणी रेल्वे येऊ शकते याचे देखील तिला भान राहिले नाही तिकडून येणारी रेल्वे दिसल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा करून तिला सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र कानाला हेडफोन लावला असल्याने नागरिकांचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि अवघ्या काही सेकंदात पुणे नागपूर रेल्वे गाडीखाली तिच्या देहाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. रेल्वे गाडीने पन्नास फुटापर्यंत तिला फरफटत नेले त्यात तिने प्राण गमावले.