आईचा खून करून पोलिसांची वाट पाहत खुर्ची टाकून बसला , कारणही असे की ?

Spread the love

देशात एक खळबळजनक अशी घटना मध्य प्रदेशात उघडकीला आलेले असून तिकमगड जिल्ह्यात अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाने आई आपल्याला जीव लावत नाही या भावनेतून आईवर गोळीबार करत तिचा जीव घेतलेला आहे. आई सतत ओरडायची आणि आपल्याला मारहाण करायची त्यामुळे आपण वैतागून गेलेलो होतो असे देखील त्याने म्हटले आणि वडिलांची बंदूक घेऊन आईवर गोळीबार केला त्यात आईचा मृत्यू झाला.

तिकमगड येथील भरत नगर परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून सपना रजक असे मयत महिलेचे नाव आहे . आंघोळ केल्यानंतर आई बाहेर आली त्यावेळी आरोपी मुलगा हा समोरच उभा होता आणि त्याने आईवर गोळी चालवली. गोळी घालण्यापूर्वी त्याचे आईसोबत भांडण झालेले होते त्यामुळे तो बाथरूमच्या बाहेरच बंदूक घेऊन उभा होता आणि आई दिसताच त्याने गोळीबार केला. गोळीबारात आई मृत्युमुखी पडल्यावर तो घाबरून गेला मात्र त्याने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांची वाट पाहत घराबाहेर खुर्ची टाकून बसलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले असून प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे.


Spread the love