‘ घटनेच्या कलम 21 कृपेकरून ‘ , अनोखा विवाहसोहळा संपन्न

सर्व धार्मिक विधींना फाटा देत चक्क भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मध्य प्रदेशातील एक वकील आणि शिक्षक यांनी अनोखा विवाह केलेला असून राज्यघटनेची प्रत हातात घेऊन त्याची प्रस्तावना वाचून त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतलेली आहे . मध्य प्रदेशातील बैतुल येथील ही घटना असून या नवदांपत्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात आहे.

बैतूल येथील कोठे बाजार परिसरात राहत असलेले वकील दर्शन बुंदेला आणि इटारसी रोड येथील रहिवासी असलेल्या राजश्री अहिरे यांचा रविवारी विवाह पार पडला त्यावेळी त्यांनी धार्मिक विधींना फाटा देत कोणतेही विधी या लग्नात केले नाही मात्र घटनेच्या कलम 21 नुसार व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराखाली आम्ही हे लग्न करत असून आमच्या लग्नाला येऊन आम्हाला आशीर्वाद द्या असे म्हटलेले आहे.

दर्शन हे जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करतात तर राजश्री या हरदा जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बारा वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि अखेर ते विवाह बंधनात अडकले. घटनेच्या कलम 21 नुसार आम्ही हा विवाह करत आहोत असे त्यांनी सांगितलेले असून प्रस्तावना वाचून त्यांनी हा विवाह केलेला आहे .