मानसी नाईक बनवतेय चुलीवर चपात्या, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव: पहा व्हिडीओ

Spread the love

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर कायम सक्रिय असून आपल्या फॅन्ससाठी काहीतरी नवीन ती घेऊन येतच असते . काही इंस्टाग्राम रील्स ती आपल्या पतीसोबत देखील शेअर करते मात्र आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात चक्क मानसी चुलीवर चपात्या बनवताना पहायला मिळते आहे . तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस सुरू आहे तर त्याला जोडीला तिने नायक चित्रपटातील ‘ रुखी सुखी रोटी ‘ गाण्याची जोड दिलेली आहे . मानसी नाईकने काही दिवसांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरा याच्याशी लग्न केलेले असून त्यांच्या लग्नाची देखील जोरदार चर्चा रंगली होती.

मानसीने व्हिडीओमध्ये तिनं पिंक रंगाची छान साडी नेसली आहे आणि नेहमी सारखी ती चांगल्याच रंगीबेरंगी फुल मेकअपमध्ये दिसत आहे. मात्र मानसीचा हा गावठी अंदाज चाहत्यांना मात्र भलताच आवडलेला दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. एकापेक्षा एक कमेंट करून चाहत्यांनी तिचं कौतुक केले आहे. मानसीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, ‘ भूख का रिश्ता सिर्फ़ रोटी से है,चमकती थालियाँ भूख नहीं मिटाती🙏🏻😇. यासोबतच तिनं पुढं म्हटलं आहे की, जेव्हा मी सासरी चुलीवरती रोटी करायला शिकले..अशी कॅप्शन देखील तिनं खाली दिली आहे.

एका चाहत्यानं म्हटले आहे की,खूपच छान तुम्हाला कशाचं गर्व अभिमान नाही आहे. तुम्हाला चुलीवरच्या चपात्या बनवतांना खूप आश्चर्य वाटत आहे. आणि आज कालच्या मुलींना तर ते पण करता नाही येत खूप अभिमान आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की, खूपच छान ताई आजकालच्या जमान्यात चुलीवर जास्त पदार्थ कोणाला जमत पण नाही आणि आपण एवढ्या चांगल्या चुलीवर चपात्या बनवल्या. आज कालच्या मुली तर नकाशे काढतात चपाती बनवता पण येत नाही. म्हणून ऑप्शनला मॅगी बनवतात खरंच खूप छान वाटलं तुम्हाला जेवण बनवताना बघून.

काहींनी फनी कमेंट देखील केल्या आहेत. मॅडम जेवण तयार झालं असेल तर येऊ का जेवण करायला..तर आणखी एकाने म्हटलं आहे की,हे तर आमचं घर दिसतंय चूल पण आमचीच पण बायको मात्र आमची दिसत नाही..अशा कमेंट करत काहींनी तिच्या लुकचे तर काहींनी तिच्या स्वयंपाकाच्या स्किलचं कौतुक केले आहे.


Spread the love