दारूच्या नशेत गर्भवती बायकोला ‘ अशी ‘ अघोरी शिक्षा की..

सोशल मीडियावर सध्या एक खळबळ जनक असा प्रकार चर्चेत आलेला असून गर्भवती असलेल्या एका पत्नीला एका व्यक्तीने शिक्षा म्हणून चक्क दुचाकीला बांधले आणि त्यानंतर तिला फरफटत नेले. उत्तर प्रदेशातील पिलीभीत इथे ही घटना समोर आलेली असून या पतीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे . सदर प्रकारात गर्भवती असलेली महिला गंभीर जखमी झालेल्या असून तिच्यावर उपचार सुरू आहे तर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, घुंगसाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून घटना घडली त्यावेळी तिचा पती दारूच्या नशेत होता. त्याने दारूच्या नशेत बायको सोबत भांडण केले आणि त्यानंतर तिला चक्क दुचाकीला बांधून फरपटत नेले त्यामुळे ती गंभीर जखमी झालेली असून पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकलेल्या आहेत. सुमन असे या पत्नीचे नाव असून तिचा पती रामगोपाल हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

पीडित महिलेच्या भावाने त्यानंतर आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दिलेली असून पोलिसांनी रामगोपाल याला ताब्यात घेतलेले आहे. त्याच्यावर कलम 307अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटना घडली त्यावेळी महिलेचा पती हा मद्यधुंद अवस्थेत होता त्यावेळी त्याने रागात तिला शिक्षा म्हणून त्याच्या पत्नीला दुचाकीला बांधले आणि त्यानंतर तिला फरपटत नेले. गर्भवती असलेली महिला त्यावेळी विनवणी करत होती मात्र पती-पत्नीत गंमत सुरू असेल असे समजून नागरिकांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले मात्र अखेर परिसरातील नागरिकांनी त्याला अडवत पत्नीची सुटका केली मात्र ती यात गंभीर जखमी झालेली आहे.