महाराष्ट्र हादरला..चक्क दवाखान्यातच आईने मुलीला मारायला सुरु केले, आरोपी इतका जवळचा की

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून जिला मुलगी मानले होते त्याच मुलीवर त्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना नागपूर इथे समोर आलेली आहे . इयत्ता नववीत शिकत असलेल्या मुलीच्या पोटात दुखत होते म्हणून आई तिला दवाखान्यात घेऊन गेली असता मुलगी चक्क चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समजताच आईच्या पायाखालील वाळूच सरकली. दवाखान्यातच आईने मुलीला मारायला सुरुवात केली मात्र डॉक्टरांनी समजूत घातल्यानंतर आई थेट कळमना पोलिस ठाण्यात गेली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ४५ वर्षीय शेजाऱ्याला अटक केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमळण्यातील एका परिसरात कॅटरिंगचा व्यवसाय करणारे दाम्पत्य राहतात. त्यांचा सुखाचा संसार सुरु असून त्यांना १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) असून ती नवव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिच्या घराशेजारी आरोपी मनीष मधुकर पराते (४५) हा पत्नीसह राहत असून त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला अद्याप मूलबाळ झालेले नाही त्यामुळे त्याने रिया हिलाच आपली मुलगी मानले होते . तो नामांकित कंपनीत ड्रायव्हर असून त्याची ड्युटी ही शिफ्टमध्ये असते.

त्याची अनेकदा रात्रपाळी ड्यूटी लागत असल्याने त्याच्या बायकोला सोबत म्हणून रिया त्यांच्या घरी झोपायला जात होती. जुलै महिन्यात मनीष हा रात्रपाळी ड्युटीवर गेल्यामुळे रिया त्याच्या पत्नीकडे झोपायला गेली मात्र तरी दोन वाजताच आरोपी मनीषा हा घरी आला आणि रियाला त्याने झोपेतून उठवले आणि रियाशी अश्‍लील चाळे करायला सुरुवात केली.

रियाला दुसऱ्या खोलीत त्याने उचलून नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले . धक्कादायक बाब म्हणजे निपुत्रिक असलेल्या मनीषने रियाला मुलगी मानले होते. परंतु त्याची तिच्यावरच वाईट नजर पडली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने अत्याचाराची कबुली दिली आहे .


Spread the love