पुणे हादरले..नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी ‘ इतका ‘ जवळचा की..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे इथे वडगाव परिसरात उघडकीस आली असून आई वडिलांचे छत्र हरपलेल्या एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित मुलीच्या आई वडिलांच्या निधनानंतर सांभाळ करणाऱ्या काकानेच पुतणीसोबत हा गैरप्रकार केला असून काकाच्या भीतीने ही मुलगी बोलत नव्हती मात्र अखेर तिने शेजारी राहणाऱ्या एक महिलेला हा प्रकार सांगितला आणि या प्रकाराला वाचा फुटली. धक्कादायक बाब म्हणजे काकाचे वय ४९ वर्षे असून हा नराधम गेल्या तीन वर्षांपासून तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार करत होता.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. वडिलांच्या निधनानंतर पीडित मुलगी आणि तिचा 12 वर्षांचा भाऊ आणि आई काकासोबत राहू लागले. दरम्यान वडिलांच्या मृत्यूनंतर काही कालावधीने काकीचाही मृत्यू झाला आणि दोन वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आईचंही निधन झालं त्यामुळे आरोपीला रान मोकळे मिळाले आणि त्याने नीचतेची पातळी गाठली. सदर संतापजनक प्रकार हा 13 डिसेंबर 2018 पासून 25 नोव्हेबर 2021 या कालावधीत घडला आहे.

आरोपी काकानं अनाथ पुतणीवर सर्वप्रथम 13 डिसेबर 2018 रोजी बलात्कार केला आणि या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या भावाला जीवे मारेल, अशी धमकी आरोपीनं पीडितेला आणि तिच्या भावाला दिली. त्यामुळे भीतीने दोघांनीही या घटनेबाबत कोणालाच काही सांगितलं नाही मात्र त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी पीडित मुलीचं लैंगिक शोषण करण्याचा धडाकाच लावला.

25 नोव्हेंबर २०२१ रोजी पीडित मुलीला प्रचंड त्रास होऊ लागला म्हणून पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या महिलेकडे केली आणि तिला त्रास होत असल्याचं सांगितलं. महिलेला मुलीसोबत झालेल्या प्रकाराची कल्पना आली मात्र मात्र मुलगी खरे बोलत नव्हती अखेर शेजारीण महिलेने तिला विश्वासात घेतले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शेजारी राहणाऱ्या महिलेनं पीडित मुलीला घेत सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आरोपी काकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


Spread the love