
प्रत्येक मोठ्या शहरात बेघर व्यक्ती राहत असून या व्यक्तींना हटवण्याचे आदेश देण्यासाठी दक्षिण मुंबई येथील एका वकिलांच्या संघटनेने याचिका दाखल केलेली होती त्यावर न्यायालयाने आदेश देताना बेघर व्यक्तींची समस्या ही जागतिक समस्या आहे. पॅरिस न्यूयॉर्क यासारख्या शहरात देखील ही समस्या आहे मात्र तीदेखील माणसेच आहेत इतर लोकांप्रमाणे आमच्या समोर ते देखील समान आहेत असे म्हटलेले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने यावर आदेश दिलेले आहेत.
बोरिवली येथील दोन दुकानदार पंकज आणि गोपाळ कृष्ण अग्रवाल यांनी फुटपाथवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या स्टॉलच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संपूर्ण शहरावर परिणाम करणारा मोठा मुद्दा म्हणत न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली त्यानंतर बॉम्बेबार असोसिएशनने देखील मध्यस्थी याचिका दाखल केली आणि फुटपाथवर राहणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी ही याचिका दाखल होती मात्र न्यायालयाने अखेर ती देखील माणसेच आहेत असे म्हटलेले आहे .