‘ तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे ‘ , अल्पवयीन मुलीला नेलं अन..

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण परभणी येथे समोर आलेले असून एका अल्पवयीन मुलीला दुसऱ्या अल्पवयीन आरोपीने तुला तुझ्या मैत्रिणीने बोलवले आहे असे सांगत तिला सोबत घेऊन तिच्यासोबत फोटो काढून तिचा विनयभंग करण्यात आलेला आहे सोबतच तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे असे देखील ते मुलीला म्हणाले त्यानंतर दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील हे प्रकरण असून तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती त्यावेळी सतरा वर्षाचा एक मुलगा आणि अठरा वर्षाचा एक मुलगा तिच्याजवळ आले आणि त्यातील एकाने तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे तू आमच्या सोबत चल असे म्हणत तिला सोबत घेऊन गेले. मुलगीसोबत आल्यानंतर त्यांनी तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे असे म्हणत या मुलीसोबत बळजबरीने फोटो काढले आणि आमची सेटिंग लावली नाही तर हे फोटो आम्ही सोशल मीडियावर शेअर करू असे देखील त्यांनी या मुलीला धमकावले.

घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलीने झाला प्रकार तिच्या आजीला सांगितला आणि त्यानंतर मुलीच्या वडिलांना याप्रकरणी खबर देण्यात आली. मुलीचे वडील हे ऊसतोड कामगार असून तात्काळ त्यांनी घरी धाव घेतली आणि गंगाखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलेली आहे.