डॉक्टर तरुणी प्रियकराला भेटायला त्याच्या घरी गेली अन..

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण जम्मू इथे समोर आलेले असून बीडीएस झालेल्या एका तरुणीची तिच्या डॉक्टर प्रियकराने चाकूने वार करत हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला असून मी काही वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या करत आहे अशी त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्यानंतर एका नातेवाईकांनी ही पोस्ट वाचली आणि या तरुणाचा जीव वाचवलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुमेधा शर्मा ( वय 26 ) असे या तरुणीचे नाव असून होळीसाठी ती दिल्लीवरून जम्मूला गेलेली होती. तिथे गेल्यानंतर ती तिचा मित्र जोहर याला भेटण्यासाठी ती त्याच्या घरी गेली त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली तेव्हा आरोपी जोहर याने तिच्या पोटात चाकूने वार केले त्यात तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्यात भांडण कशामुळे झाले याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.