फॅक्ट चेक : खरोखरच पंजाबमध्ये कंगनाची गाडी शेतकऱ्यांनी अडवली का ? , पहा व्हिडीओ

Spread the love

भाजपची वाचाळवीर म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोषाचा सामना करावा लागल्याचे वृत्त तमाम गोदी मीडियात रंगवण्यात आले होते. सातत्याने शेतकरी आंदोलकांचा खलिस्तानी म्हणून उपहासात्मक केलेला उल्लेख आणि स्वातंत्र्य सैनिकांचा तिने केलेला अपमान देशवासीय विसरलेले नाहीत. आपल्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी हल्ला केल्याचं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तिने म्हटलं आहे मात्र प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये असा कोणताच प्रकार घडल्याचे दिसत नाही .

कंगनाने म्हटले होते की , ‘मी फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे हिमाचलमधून पंजाबमध्ये आले. मात्र पंजाबमध्ये प्रवेश करताच किरतपूर साहिबजवळील बुंगा साहिब येथे एका जमावाने माझ्या कारला घेरलं.. त्यांनी शेतकरी असल्याचं म्हणत माझ्या कारवर हल्ला चढवला. इतकंच नव्हे तर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं अभिनेत्रीनं म्हटलं आहे. तसेच शेतक-यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यान शेतक-यांविरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल अभिनेत्रीने माफी मागितली पाहिजे ‘ . सदर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओनुसार तिच्यासोबत असा कोणता प्रकार झाल्याचे तरी दिसून येत नाही . आंदोलकांनी केवळ ‘ कंगना गो बॅक ‘च्या घोषणा दिल्याचा एक व्हिडीओ आहे. तिची गाडी अडवली मात्र त्यानंतर कंगनाने गाडीच्या बाहेर डोकावत आंदोलकांना हात केला आणि ती पुन्हा गाडीत बसून निघून गेली.

कंगनाने दावा केला होता की, ‘ जर माझ्यासोबत सुरक्षा नसती. तर आज मला या चौकशीशिवाय जमावानेच मारून टाकलं असतं तसेच अभिनेत्री त्याठिकाणी महिला आंदोलकांना समजतावताना दिसून आली. शिवाय आपला पक्ष मांडत तिने सांगितलं हि, मी महिला आणि शेतकरी आंदोलकांविरुद्ध चुकीचं काहीही बोलले नाही ‘. व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून कंगना पुन्हा खोटे बोलली असल्याचे दिसून येत असून तिचा हा दावा फोल ठरलेला दिसून येत आहे.


Spread the love