महाराष्ट्रात एक संतापजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून एका केतकर नावाच्या आजोबांनी एका लाकडी काठीला चक्क खिळे ठोकून त्या काठीने मांजरांना मारहाण करण्याचा प्रकार केलेला आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरातील ही घटना असून पोलिसांनी या आजोबांच्या विरोधात कारवाई केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चंद्रकांत केतकर ( वय 72 ) असे या आजोबांचे नाव असून त्यांना मांजरांचा प्रचंड राग आहे त्यातून त्यांनी घराच्या जवळपास फिरणाऱ्या तब्बल 72 डझनभर मांजरींना मारण्यासाठी एक काठी हातात घेतली मात्र मांजरी हाती येत नसल्याने त्यांनी काठीला अणकुचीदार खिळे लावले आणि त्यानंतर ही काठी फेकून मांजरांना जखमी करण्याचा प्रयत्न केला . प्राणिमात्र संघटनेने त्यानंतर याप्रकरणी दखल दिली आणि पोलिसांनी अखेर आजोबांवर कारवाई केली.
जस्ट स्माईल चॅरिटेबल ट्रस्ट नावाच्या एका संस्थेच्या पदाधिकारी यांनी आपल्याकडे एका व्यक्तीविषयी तक्रार आलेली होती असे सांगत फेब्रुवारी महिन्यात आम्ही पोलिसांना कळविलेले होते त्यानंतर सदर व्यक्तीला समज देखील देण्यात आलेली होती मात्र त्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही उलट त्यांनी काठीला खिळे ठोकून घेतले आणि त्या काठीने मांजरांना मारण्याचा प्रकार केला त्यामुळे अखेर त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला असून गिरगाव येथील व्ही पी रोड पोलीस ठाण्यात चंद्रकांत केतकर यांच्या विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.