
पुणे जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून मावळ तालुक्यातील उद्योगपती आणि तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर भरदिवसा दुपारी तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले अन त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे . मावळ तालुक्यात या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.
उपलब्ध माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन खाली आलेले होते त्यावेळी आरोपी हे दबा धरून बसलेले होते. चार आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यातील दोन जणांनी गोळीबार केला तर इतर दोन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. घटना घडल्यानंतर किशोर आवारे रक्तबंबळ झालेले होते. त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा इथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे.